गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात अनेक गोष्टी घडत आहेत. कधी
असहिष्णुतेचा मुद्दा तर कधी मंदिरात महिलांना केला जाणारा मज्जाव तर कधी
इतर अनेक राजकीय नाट्य. एकंदरीत काय तर आपला समाज ‘जिवंत’ असल्याचे पदोपदी
जाणवते आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनेत एक घटना अशीही होती की
त्याबद्दल बरीच उलट सुलट चर्चा झाली. प्रत्येकाने आपले मत मांडले पण त्याचा
परिणाम मात्र समाजातील काही घटकांवर जास्तच झाला. ती घटना म्हणजे अनेक वर्षांपासून चालू असलेल्या खटल्यातून झालेली सलमान खान याची सुटका.
खरे तर माझ्या मते सलमान खान निर्दोष सुटणे ही गोष्ट कायदेशीर बाब आहे. सलमान गाडी चालवत होता का? त्यावेळेस तो दारूच्या नशेत होता का? गाडीचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झाला की संतुलन सुटल्यामुळे? तपास यंत्रणेने योग्य तपास केला का? असे अनेक प्रश्न या केसमुळे उपस्थित झाले. पोलीस यंत्रणेने तपास करून सलमानवर खटला दाखल केला. त्यानंतर एका न्यायालयात त्याला दोषी ठरवले गेले. वरच्या न्यायालयात त्याला निर्दोषही ठरवले गेले. आता सरकार त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात देखील जावू शकेल. पण तिथेही न्याय मिळेल का? मिळेल तर कुणाला? माझ्या मते हे अपयश तपास यंत्रणेचे आणि तपासात राहिलेल्या त्रुटींचे आहे. पण मला त्यावर भाष्य करायचे नाहीये. कारण या खटल्यातील सगळ्याच गोष्टी मला वर्तमानपत्र आणि न्यूज चँनलवरील बातम्या पाहून समजल्या आहेत. त्यात किती तथ्य आहे हेही मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. मला बोलायचे आहे ते या खटल्याच्या निकालानंतर त्याचा समाजावर झालेल्या परिणामाबद्दल.
परवा एका मित्राकडे गेलो होतो. निघण्याच्या वेळेस तिथेच जवळच राहणारे मनोहर काका भेटले. मनोहर काकांचे वय जवळपास ७०च्या दरम्यान असावे. आम्हाला पाहून काका थांबले. दोन मिनिटे एकमेकांची विचारपूस झाली आणि काका पुढे निघाले. मी आणि मित्र परत आमच्या गप्पात रंगलो. इतक्यात मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने पाहिले तर एका दुचाकीने काकांना मागून उडवले होते. गाडी चालवणारा १६/१७ वर्षांचा मुलगा असावा. काका ज्या गतीने चालत होते आणि गाडीने त्यांना ज्या पद्धतीने उडवले, त्यावरून चूक सर्वथा त्या गाडी चालकाची होती हे लक्षात येत होते. काकांना जास्त लागले नाही म्हणा... थोडेसे खरचटले. थोड्या अंतरावर तो मुलगा सुद्धा गाडीसहित पडला होता. त्यालाही जास्त लागलेले दिसत नव्हते. काकांच्या हातातील सामान मात्र रस्त्यावर पसरले होते. आम्ही काकांना मदत करण्यासाठी त्यांच्या दिशेने धावलो. मी, माझा मित्र तसेच अजून ३/४ जण काकांचे रस्त्यावर पसरलेले सामान गोळा करायला लागलो. एकदोन जण गाडी उचलून रस्त्याच्या बाजूला घेत होते. काका जसे उठले तसे त्या मुलाजवळ गेले आणि काही विचार न करता त्यांनी त्या मुलाच्या कानाखाली खेचली. त्या पोराने एकदा आजूबाजूला पाहिले आणि त्यानेही मग कोणताही विचार न करता काकांच्या श्रीमुखात भडकवली. आमच्या सगळ्यांसाठी हे मात्र नवीनच होते. एकतर १६/१७ वर्षाचं ते पोर. त्याचीच चूक आणि वरून ही मिजास... आम्ही तिथे पोहोचेपर्यंत घाईघाईत त्याने गाडी गाठली आणि तिथून पसार झाला. आम्ही काकांजवळ जमून त्यांना इतर कुठे जास्त लागले तर नाही ना हे पाहू लागलो. काही वेळातच तो मुलगा एका त्याच्याच वयाच्या मुलाला घेऊन परत तिथे आला. काही जण काकांना पोलिसकेस करा म्हणून सल्ला देत होते. तो मुलगा डायरेक्ट काकांसमोर गाडीसाहित उभा राहिला आणि म्हणाला... ‘सॉरी... लागलं असल तर... पण ते पोलीस केस करायची असेल तर खुशाल करा... पोलीस माझे काहीच वाकडे करू शकणार नाहीत. माझ बाप मला हातही लागू देणार नाही. तुमचा मात्र पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्यात चांगला वेळ जाईल...’ आणि मग चक्क छद्मीपणे हसत अगदी भरधाव वेगाने निघूनही गेला. आम्ही सगळे पुतळे बनलो होतो. मनात म्हटले... आपण पांढरपेशे लोकं... कुठे गुंडांच्या नादी लागणार? परत प्रश्न वेळेचाही येतो. आपल्याकडे आहे का तितका वेळ या सगळ्या गोष्टी करायला? खरे तर माझ्या या पांढरपेशा विचारांची नंतर मला लाजही वाटली. पण मी आता कोडगा झालो आहे. या गोष्टी मी मनावरच घेत नाही. असो...
दोघे तिघे जण मात्र काकांनी पोलीस केस करावी यावर ठाम होते आणि तेवढ्यात एकजण म्हणाला... ‘काका... जाऊ द्या... कुठे चिखलात दगड मारून शिंतोडे अंगावर उडवून घेता? तो सलमान तर राजरोसपणे अपघात करून माणसे मारतो आणि नंतर निर्दोष देखील सुटतो. तुम्हाला तर फक्त खरचटले आहे. पोलीस मनावर सुद्धा घेणार नाहीत तुमची केस. त्यांना काय इतर कामे कमी आहेत? तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा पण माणसाने व्यावहारिक विचार केला तर तो सुखी राहतो. आपण आता फक्त इतकीच काळजी घ्यायची की आपली मुले अशी कुणाला त्रासदायक ठरणार नाहीत.’
मनात विचार केला... खरंच ती व्यक्ती जे बोलली त्यात काय खोटे होते? सलमान एखाद्या वेळेस निर्दोष असेलही पण त्याच्या निर्दोष सुटण्याने समाजाचे काही प्रमाणात नुकसानच नाही का झाले?

No comments:
Post a Comment