माझ्या बद्दल

मी व्यवसायाने वेब डेव्हलपर आहे. माझा पोटापाण्याचा उद्योग तोच. लिखाण हा माझा छंद आहे. आवडते म्हणून लिहितो, आणि मी लिहितो म्हणून माझे काही मित्र ते वाचतात इतकेच. आतापर्यंत मी फेसबुकवरच लिहित आलो आहे. मध्यंतरी आपलाही ब्लॉग असावा असे वाटले होते. त्यानुसार त्याची सुरुवातही केली होती पण परत पोटाचा प्रश्न समोर आला आणि स्वतः ऐवजी इतरांचे ब्लॉग बनवून दिले. लिखाणाबद्दल लिहायचे झाले तर मला हलकं फुलकं लिहायला आवडतं. काही महिने मी मुंबई मध्ये प्रकाशित होणाऱ्या पथदर्शनी साप्ताहिकामधून ‘हलकं फुलकं’ सदराखाली काही ललित लेख लिहित होतो. जवळपास २०१२ पासून वेगवेगळ्या दिवाळी अंकातही माझे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. फेसबुकवरील काही समूहामध्येही काही कथा लिहिल्या आहेत. आणि आता मी फेसबुकपासून एक पाऊल पुढे टाकत स्वतःचा ब्लॉग बनवतो आहे. आशा आहे तो ही सर्वांना आवडेल. 

बाकी माझ्याबद्दल काय बोलू? तसेही सामान्य माणसाकडे बोलण्यासारखे काही नसतेच... माझे ललित लेख / कथा / अनुभव तुमचे काही वेळासाठी जरी मनोरंजन करू शकले तरी माझे ब्लॉग लिहिण्याचे उद्दिष्ट सफल झाले असे मी समजेन... 

खूप खूप धन्यवाद... 

मिलिंद भरत जोशी, नाशिक 
९६५७४६२६१३

milind158@gmail.com