रामराम,
खरे तर हा ब्लॉग मी २०१२ मध्येच बनवला होता. पण त्यावेळेस पोस्ट काय करावे हा प्रश्न होता. त्यानंतर फेसबुकवर इतका सक्रीय झालो की आपण एक ब्लॉगही बनवला आहे हेच विसरून गेलो. त्यानंतर मधून मधून ब्लॉगची आठवण यायची आणि जशी आली तशी निघूनही जायची. व्यवसायाने वेब डेव्हलपर असल्यामुळे या दरम्यान अनेकांचे ब्लॉग बनवून दिले पण माझा ब्लॉग मात्र माझ्याकडूनच दुर्लक्षित राहिला. आता मात्र याकडे दुर्लक्ष होणार नाही याची मी काळजी घेणार आहे.
आता या ब्लॉग मध्ये काय असेल? तेच हो... माझ्यासारख्या सामान्य माणसाचे सामान्य अनुभव यात असतील. जे प्रसंगी तुमच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटवू शकतील. काही गोष्टी अतिशयोक्तीच्याही वाटतील... त्या तशाच आहेत हे तुम्ही समजून घ्या. बाकी ब्लॉग मध्ये व्यक्त केलेले विचार हे माझ्या अनुभवातून आलेले आहेत त्यामुळे त्याच्याशी इतरांनी सहमत असलेच पाहिजे असे नाही. या ब्लॉगच्या माध्यमातून मी फक्त वाचकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
अस्वीकारण :
माझ्या कोणत्याही पोस्ट / अनिर्बंध / लेख / विडंबन / कविता / कथा यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी अथवा घटनेशी अथवा स्थळांशी कोणताही संबंध नाही तसेच माझे कुणीशी शत्रू किंवा हितशत्रू नसल्याने यात कोणाचाही जाणूनबुजून उल्लेख केलेला नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. मी इथे फक्त दुसऱ्याला आनंद देण्यासाठी येतो. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
सगळ्यात महत्वाचे...
माझ्या लिखाणाला कोणीही साहित्यिक दर्जा देण्याचा प्रयत्न करू नये. माझे लिखाण हे वयाने वाढलेल्या, पण बुद्धीने न वाढलेल्या माणसाची वायफळ बडबड समजण्यात यावे आणि ते कुणीही गंभीरपणे घेवू नये... घेतल्यास त्याची जबाबदारी ही फक्त त्या व्यक्तिचीच असेल.
मिलिंद जोशी, नाशिक...
९६५७४६२६१३
